ब्रेकफास्ट न्यूज | नाशिक | इराणच्या यशामागचा मराठमोळा चेहरा, प्रशिक्षक शैलजा जैन यांच्याशी खास गप्पा
1,627 views · Published 27 August 2018 · 12:34 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
#ब्रेकफास्टगप्पा #शैलजाजैन #कब्बडी इंडोनेशियातल्या एशियाडमध्ये भारतासाठी पदकं जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूबद्दल आपल्याला अभिमान आहेचे.. पण त्यासोबतच भारतीय खेळाडूंमध्ये खरंच किती स्पोर्टिंग स्पिरिट आणि खेळाविषयी निस्सीम प्रेम असतं हे एका यशातून समोर येतंय. महिला कबड्डीच्या सुवर्णपदकाचा मानकरी ठरला इराणी संघ. पण या कामगिकीत नाशिकच्या एका मराठमोळ्या प्रशिक्षिकेचा मोलाचा वाटा आहे. त्यांचं नाव शैलजा जैन. त्या गेली दीड वर्षे मुख्य प्रशिक्षिका या नात्यानं इराणच्या मुलींना कबड्डीचं मार्गदर्शन करत आहेत. त्यांचं लग्नाआधीचं नाव शैलजा धोपाडे. त्या मूळच्या विदर्भातल्या.. त्यांनी राष्ट्रीय कबड्डीत विदर्भाचंच प्रतिनिधित्व केलं आहे. लग्नानंतर शैलजा नाशिकमध्ये स्थायिक झाल्या, पण त्यांनी कबड्डीची नाळ तुटू दिली नाही. कबड्डी प्रशिक्षणात इराणच्या मुलींच्या संघाची जबाबदारी त्यांनी कशी यशस्वीरित्या सांभाळली. दुसऱ्या देशात जाऊन त्या महिला खेळाडूंना आपल्या मुलींप्रमाणे वागवणं, सांभाळणं, त्यांचा खेळ विकसित करणं हे किती आव्हानात्मक होतं, हे सगळं जाणून घेऊया
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!