मुंबई | दादर फूल मार्केटमधील हत्येचा उलगडा
1,859 views · Published 15 October 2018 · 0:44 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
दादरच्या फुलमार्केटमध्ये शुक्रवारी गोळ्या झाडुन मनोजकुमार मौर्य या इसमाची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलय. याप्रकरणी दिल्लीतून राधाकृष्ण कुशवाह या व्यापाऱ्याला अटक करण्यात आलीय. तसेच त्याला साथ देणाऱ्या दोन मित्रांनाही अटक करण्यात आलीय. मनोजकुमारला माऱण्यासाठी ५० हजारांची सुपारी देण्यात आली होती. मुख्य आरोपी राधाकृष्ण कुशवाह याने त्याच्या साथिदारांना हे पैसे दिले. त्यांनी दादर येथे येउन मनोजकुमारची हत्या केली आणि पुन्हा दिल्लीला फरार झाले. मृतकाची पत्नी ही राधाकृष्ण कुशवाहच्या कंपनीत कामाला होती. आरोपी आणि मनोजकुमार यांच्यात वाद झाल्यावर मनोजकुमार त्याच्या पत्नीला घेउन मुंबईला आला होता. याच वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट