अंबरनाथ | आमदारसाहेब, एसी गाडीतून फिरण्यासाठी निवडून दिले नाही, नागरिकांची पोस्टरबाजी

3,167 views · Published 29 August 2018 · 1:31 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अंबरनाथ शहरातील रस्त्यांची दुर्दशा एबीपी माझानं दाखवली होती. त्यानंतर नागरिकांनी स्थानिक आमदार बालाजी किणीकरांविरोधात पोस्टरबाजी केली आहे. अंबरनाथमधील रस्त्याची दुरावस्था इतकी आहे, की लोकांना रस्त्यावरुन गाडी चालवणं सोडाच, चालणंही मुश्कील झाल्याचं चित्र आहे. परंतु आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना रस्ता दुरुस्ती करण्यासाठी अजिबात वेळ नसल्याचं दिसत होतं. अखेर काल रात्री अंबरनाथ शहरातल्या अनेक भागांमध्ये ही पोस्टरबाजी पाहायला मिळाली. एसी गाडीतून फिरण्यासाठी निवडून दिलेलं नाही, तर जरा रस्त्याची दुर्दशा बघा, असा उपरोधिक टोला लगावणारे पोस्टर शहरभर लावण्यात आलेत.

More from this channel