बदलापूर | सुट्टीच्या दिवशी बदलापूरकरांनी खड्डे बुजवले
1,626 views · Published 20 September 2018 · 1:26 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
खड्ड्यांनी त्रस्त झालेले बदलापुरचे नागरिक आता स्वतःच खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. विशेष म्हणजे फेसबुकवर याबाबत आवाहन करण्यात येत असून त्याला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळतोय. खड्डे बुजवणारे हे सगळे बदलापूरकर नोकरी करणारे आहेत. सुट्टीच्या दिवशी एकत्र येऊन ते खड्डे बुजवण्याचं काम करतात. कात्रप, डी मार्ट, अंबरनाथ रोड भागात मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी महेश आपटे यांनी फेसबुकवर बदलापूरकरांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. त्यानंतर प्रत्येक सुट्टीच्या दिवशी बदलापूरकर एकत्र येऊन खड्डे बुजवण्याचं काम करू लागले. रस्त्याच्या कडेला पडलेली खडी, ग्रीट पावडर, पेव्हर ब्लॉक आपल्या गाडीत भरायचे आणि खड्डे असलेल्या ठिकाणी जाऊन बसवायचे, हा नित्यक्रम मागील काही दिवसांपासून सुरू आहे.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही