नक्षलवादाबाबत काँग्रेसची दुतोंडी भूमिका, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल | रायपूर | एबीपी माझा

657 views · Published 9 November 2018 · 2:22 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोरममध्ये प्रचार सभा तापत आहेत. आज छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. नक्षलवादाबाबत काँग्रेसनं नेहमीच दुतोंडी भूमिका घेतल्याचा आरोप मोदींनी केला आहे. एकीकडे शहरी नक्षलवादाचं समर्थन करायचं आणि दुसरीकडे छत्तीसगडच्या नक्षली भागात आल्यावर नक्षलवादावर कारवाई करण्याच्या बाता करायच्या. ही काँग्रेसची दुतोंडी भूमिका असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. पत्रकाराची हत्या करणाऱ्या नक्षलींनाही काँग्रेस क्रांतीकारी ठरवतंय हे दुर्दैवी आहे, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel