चेन्नई | संगीतकार, व्हायोलिनवादक बालाभास्कर यांचं आज निधन

554 views · Published 2 October 2018 · 0:49 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

संगीतकार आणि व्हायोलिनवादक बालाभास्कर यांचं आज निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. आठवडाभरापूर्वी बालाभास्कर यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात बालाभास्कर यांच्या दोन वर्षांच्या मुलीचाही मृत्यू झाला होता
बालाभास्कर हे २५ सप्टेंबर रोजी त्यांच्या कुटुंबासोबत थ्रिसूर इथं एका कार्यक्रमात गेले होते. त्यांच्यासोबत कारमध्ये चालक, पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी देखील होती. पल्लिपुरम येथे बालाभास्कर यांचे कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार झाडावर आदळली.
बालाभास्कर हे दक्षिणेतील प्रख्यात व्हायोलिनवादक होते, त्यांनी हरिहरन, सुरेश वाडकर, के. एस. चित्रा यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम केले होते. बालाभास्कर यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली.

More from this channel