मुंबई| मुंबई-जयपूर विमानाची मोठी दुर्घटना टळली

969 views · Published 20 September 2018 · 1:13 · Indexed 2 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई-जयपूर विमानाची एक मोठी दुर्घटना होता-होता टळलीय.  विमान आकाशात गेल्यानंतर हवेचा दाब नियंत्रित करणारा स्वीच सुरु करण्याचा विसर क्रू मेंबर्सना पडला. त्यामुळे विमानात हवेचा दाब कमालीचा वाढला.  अनेकांच्या नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली.  सध्या या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दोषी क्रू मेंबर्सना कामावरुन हटवण्यात आलं आहे. जेट एअरवेजचं ''9 w 697'' हे विमान होतं. एकूण १६६ प्रवाशी या विमानात होते.  सकाळी ५ वाजून ५३ मिनिटांनी मुंबईहून जयपूरसाठी उड्डाण केलं . झालेली चूक लक्षात येताच विमान पुन्हा मुंबईच्या विमानतळावर उतरवण्यात आलं. आणि प्रवाश्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

Mumbai | Jet Flight Returns To Mumbai After Cabin Pressure Loss Causes Nosebleed | Aviation Expert Reaction

More from this channel