गडचिरोली | नक्षलविरोधी पथकाच्या जवानांनी पुराच्या पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढला, व्हिडीओ वायरल

4,351 views · Published 21 August 2018 · 1:02 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथक सी-60 च्या जवानांचा एक व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. यात हे जवान पाण्याच्या प्रचंड प्रवाहातून आपला जीव धोक्यात टाकून मार्ग काढत आहेत. हा व्हिडीओ एटापल्ली तालुक्यात नक्षल विरोधी अभियान राबवत असतानाचा आहे. जवानांच्या मार्गात येणाऱ्या एका नाल्याच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की तो पार करणं अशक्य होतं. मात्र या शूर जवानांनी जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढत आपलं नक्षल विरोधी अभियान पूर्ण केलं. सध्या सोशल मीडियावर या जवानांच्या कार्याला सलाम करण्यात येतोय.

More from this channel