आंतरजतीय विवाहांमुळे देशभरात झालेले हल्ले

707 views · Published 20 September 2018 · 2:22 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

त्यानं प्रेम केलं तिनं प्रेम केलं ... करु दे की.. मला सांगा तुमचं काय गेलं... कवीवर्य मंगेश पाडगावकर यांनी तरल प्रेमाविष्कारावर लिहून ठेवलेल्या या ओळी.. पण या ओळींमधला तरलपणा जपत हा प्रश्न विचारण्याचे दिवस आता राहिलेयत काहो... या प्रश्नाचं उत्तर नाही असं असेल..हा प्रश्न आता ठणकावून विचारावा लागणार आहे...  कारण यानं प्रेम केलं तिनं प्रेम केलं तर अनेक जणांचे सन्मान प्रतिष्ठा दुखावायला लागल्या आहेत... आणि या पोकळ प्रतिष्ठांचे इमले मनात बांधून बसलेले या प्रेमाचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहात नाहीयेत.. यात सर्वात पुढे आहेत ते रक्ताचे नातेवाईक.. हैद्राबाद मधील घटना त्याचंच एक उदाहरण वडिलांनी जावयाचा जीव घेतला.. हे काही पहिलं प्रकरण नाहीये.. सोनई हत्याकांड, नितीन आगे हत्याकांड, दिल्लीतील निरुपमा पाठक हत्याकांड, मनोज आणि बबली बनवाला हत्याकांड या सगळ्या हत्या अशाच पोकळ प्रतिष्ठेचे इमले जपण्यासाठी केलेल्या आहेत.. आमि तेही रक्ताच्या नातेवाईकांनी... कधी थांबणार हे ... कसं थांबणार हे... आणखी किती सैराट बघावे लागणार.. या समाजातला एक घटक म्हणून हे थांबण्यासाठी आपण काय करू शकतो.. यासाठीच चर्चेच्या माध्यमातून आज आम्ही हस्तक्षेप करतोय आहोत..

More from this channel