नवी दिल्ली : राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या, खासदार धनंजय महाडिकांची मागणी
1,765 views · Published 23 July 2018 · 1:32 · Indexed 24 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्या, अशी मागणी कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली. लोकसभेमध्ये आज लक्षवेधी उपस्थित करत खासदार धनंजय महाडिक यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शाहू महाराज यांचं कार्य महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सामाजिक इतिहासामध्ये महत्त्वाचं आहे. आज आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची गोष्ट होते, पण देशात पहिलं आरक्षण शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात लागू केलं होतं, असं म्हणत धनंजय महाडिक यांनी शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली. यापूर्वी अनेकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला आहे. त्यामुळे शाहू महाराजांनाही भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान सरकारने करावा, असं धनंजय महाडिक म्हणाले.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट