मुंबई : गणेशोत्सवात बेकायदेशीर मंडप उभारु देऊ नका, हायकोर्टाचे प्रशासनाला निर्देश
2,290 views · Published 7 August 2018 · 1:41 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आगामी गणेशोत्सवात किमान मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यात तरी बेकायदेशीर मंडप उभारायला देऊ नका, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित महापालिका आणि राज्य सरकारला दिले आहेत. हायकोर्टाने दिलेल्या आदेशांचं पालन न झाल्यास न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करण्याचा थेट इशाराही मंगळवारी हायकोर्टाने दिला. रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा न आणता केवळ एक तृतीयांश जागेतच, सर्व बाबींची पूर्तता करुन परवानगीसह मंडप बांधण्याची मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सायलेंस झोनच्या नियमांचीही काटेकोरपणे अंमलबजावणी करत लाऊड स्पीकर्सचा वापर आणि ध्वनी प्रदूषणासाठी आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याचंही हायकोर्टानं सांगितलं. मुंबईत सध्याच्या घडीला 110 शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आली असून त्यावरील काम सुरु असल्याचं राज्य सरकारने हायकोर्टात सांगितलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!