तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचं निधन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची श्रद्धांजली
1,515 views · Published 7 August 2018 · 0:49 · Indexed 25 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वो आणि तामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने चेन्नईतील कावेरी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्यापासून रूग्णालयाबाहेर त्यांचे समर्थक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. राज्यात विविध ठिकाणी प्रार्थना केली जात होती. अनेक कार्यकर्त्यांनी आत्महत्या ही केली होती. आपल्या राजकीय कारकिर्दीत एकूण ५ वेळा ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. तसेच २७ जुलैला त्यांनी द्रमुकच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून ५० वर्षे पूर्ण झाली होती.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!