मुंबई | परळ आग | धुरातून बाहेर पडण्यासाठी चिमुरडीचं ट्रेनिंग

4,047 views · Published 22 August 2018 · 5:02 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

परळच्या उच्चभ्रू परिसरातील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत मृतांचा आकडा ४ वर गेला आहे.  २ जणांचा श्वास कोंडून तर इतर दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. एकूण १४ मजल्याच्या या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर सकाळी आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलानं मोठ्या प्रयत्नानं इमारतीतल्या २५ लोकांना सुखरुपपणे बाहेर काढलं.  ५ वर्षापूर्वी उभ्या राहिलेल्या या इमारतीला ओसी नव्हती, तसंच बिल्डरनं अग्निरोधक यंत्रणाही बसवलेली नाही, असा दावा याच इमारतीत राहणाऱ्या लोकांनी केला आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं असलं तरी परिसरात धूर कायम आहे.

More from this channel