नवी दिल्ली | पेट्रोल दरवाढीचं विघ्न हटेना, मोदींनी बैठक बोलावली

1,210 views · Published 14 September 2018 · 2:41 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पेट्रोल-डिझेल दरवाढीचं विघ्न अद्याप दूर झालेलं नाही. आजही इंधन दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 28 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महागलं आहे. मुंबईतील आजचा पेट्रोलचा दर 88.67 तर डिझेल 77.82 रुपये प्रति लिटर इतका आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत आहे. परभणीत पेट्रोलचा दर 90.45 रुपये तर डिझेल 78.34 रुपये लिटर आहे. त्यामुळे पेट्रोल दर वेगाने शंभरीकडे वाटचाल करत आहेत.

More from this channel