पिंपरी | बिल न भरल्याने वृद्ध रुग्णाला 11 दिवस डिस्चार्ज नाही, आदित्य बिर्ला रुग्णालयातील प्रकार

4,606 views · Published 24 August 2018 · 1:36 · Indexed 27 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पैसे दिले नाहीत बहात्तर वर्षीय रुग्णाला तब्बल 11 दिवस डिस्चार्ज न दिल्याचा धक्का प्रकार पिंपरी-चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयात घडलाय. याप्रकरणी रुग्णालाच्या मुख्य व्यवस्थापिका रेखा दुबे आणि प्रशासकीय अधिकारी राजेश दुबे या दोघांना अटक करण्यात आली आहे. लगेचच त्यांची जामिनावर सुटका देखील करण्यात आली आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णाकडून पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. 8 ऑगस्टला दशरथ आरडे हे आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होतो. 11 ऑगस्टला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आरडे हे आर्थिक दुर्बल घटकाखालील असताना 86 हजार 586 रुपयांचे बिल तयार केलं. मात्र हे बिल भरणं आरडे कुटुंबियांना शक्य नव्हतं. त्यामुळे रुग्णालय प्रशासनानं दशरथ आरडे यांनी घरी जावू न देता रुग्णालयातच ठेवलं. अखेर या प्रकरणी दशरथ आरडे यांच्या मुलाने पोलिसांत तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी वृद्ध रुग्णाची आज अकरा दिवसांनी रुग्णालयातून सुटका केली.

More from this channel