ब्रेकफास्ट न्यूज | सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण, सैन्याकडून नवा व्हिडीओ प्रसिद्ध

1,529 views · Published 28 September 2018 · 0:44 · Indexed 30 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पाक व्याप्त काश्मिरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला उद्या म्हणजेच 29 सप्टेंबरला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. काल लष्कराने या सर्जिकल स्ट्राईकचे नवे व्हिडीओ प्रसिद्ध केले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पराक्रम पर्वाचं आयोजन करण्यात आलं. यानिमित्ताने देशभर अनेक कार्यक्रम होणार आहेत. आज, उद्या आणि परवा असे तीन दिवस या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्यात सैनिकांचा सत्कार केला जाणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जोधपूरमध्ये एका प्रदर्शनाचं उद्घटनही केलं जाणार आहे. उरी हल्ल्याच्या काही दिवसानंतर ही मोहीम लष्कराने राबवली होती. सीमेपलीकडील दहशतवाद्यांच्या जागा लष्कराने उद्ध्वस्त केल्याचं या व्हिडीओमधून स्पष्ट होतं आहे.

More from this channel