नवी दिल्ली : राफेल डील प्रकरणी काँग्रेस मोदींविरोधात हक्कभंगाची नोटीस देणार

1,072 views · Published 23 July 2018 · 1:24 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नवी दिल्ली : राफेल डील खरेदीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात काँग्रेस लोकसभेत हक्कभंग प्रस्तावाची नोटीस देणार आहे. येत्या 24 तासात याबाबत काँग्रेसकडून निर्णय घेतला जाणार आहे.

राफेल डील खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी अविश्वास ठरावाच्या भाषणादरम्यानही केला होता. शिवाय राफेल डील खुद्द मोदींनी बदलली, असा आरोप राहुल गांधी सातत्याने करत आहे. आता त्यांनी थेट पंतप्रधानांवरच हक्कभंग आणण्याची तयारी केली आहे.

More from this channel