नाशिक | न्यायालय परिसरात नाशिक पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन

991 views · Published 11 October 2018 · 0:41 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिकमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. न्यायालयाच्या आवारात आरोपींना हजर करण्यासाठी आणल्यावर त्यांना भेटण्यासाठी अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक येतात. त्यामुळं साक्षीदार आणि वकिलांवर मोठा दबाव येत असल्याची तक्रार वकिलांनी केली होती. त्यावर आज पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 2 पोलिस अधीक्षक, 7 पोलिस निरीक्षक आणि जवळपास 100 पोलिस कर्मचाऱ्य़ांनी न्यायालय परिसरात कोम्बिग ऑपरेशन केलं. पोलिसांना बघून पळ काढणाऱ्या गुंडांना पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन ताब्यात घेतलं. अशा एकूण 100 टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येतेय.

More from this channel