चंद्रपूर | सरसंघचालक मोहन भागवतांच्या आभाराचे बॅनर, काँग्रेसची पोस्टरबाजी

588 views · Published 25 September 2018 · 0:55 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिल्लीतील कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्याचे कौतुक केल्यानंतर चंद्रपूर जिल्हा-शहर काँग्रेस समितीनं शहरातील प्रमुख चौकात भागवतांचे आभार मानणारे फलक लावले आहेत. या फलकाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
भागवत मूळचे चंद्रपूरचे आहेत. त्यांनी दिल्लीत विविध विषयांवर मार्गदर्शन करताना अनपेक्षितपणे काँग्रेसवर कौतुकाचा वर्षांव केला. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस नेत्यांचे मोठे योगदान आहे. काँग्रेस नेत्यांनी देशासाठी बलिदान दिलेत. अनेक थोर आणि महान नेते याच पक्षाने भारताला दिले आहेत. या शब्दात आपली मते मांडली. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा काँग्रेसमुक्त देशाची भाषा करत असताना भागवतांचे विधान लक्षवेधी ठरले.

More from this channel