मुंबई | मुंबईतल्या प्रवेशद्वारावरावरील 3 टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना एक महिना टोल माफ

916 views · Published 21 August 2018 · 0:55 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईतल्या प्रवेशद्वारावर असलेल्या 3 टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना एक महिना टोल माफ करण्यात आला आहे. मुलुंड येथील दोन आणि ऐरोलीमधील एका टोलनाक्यांवर सूट देण्यात आली आहे. आजपासून 23 सप्टेंबरपर्यंत छोट्या वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही. मुंब्रा बायपासचं रस्त्याचं काम सुरु आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईतील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे... त्यामुळे गणेशोत्सवापर्यंत ठाणे, ऐरोली टोलनाक्यावर छोट्या वाहनांना टोलमुक्ती द्यावी अशी मागणी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केली होती. याची दखल घेत राज्य सरकारनं महिनाभर टोल माफी दिली आहे.

More from this channel