भिवंडी : नदीवर पुलच नाही, जीव धोक्यात घालून मुलांचा शाळेसाठी प्रवास
3,346 views · Published 8 July 2018 · 3:17 · Indexed 26 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
प्रगत मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडी तालुक्यातल्या आदिवासी पाड्यांमध्ये शिक्षणासाठी मुलांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. बिजपाडा, बात्रेपाडा, रावते पाडा, ताडाची वाडी या गावात शाळेची सोय नसल्यानं गावातील 50हून अधिक मुलांना जीव धोक्यात घालून... तब्बल 5 किलोमीटरची पायपीट करुन शहापूर तालुक्यातील पिवळीच्या शाळेत जावं लागतं. एवढच नाही तर दुमडा नदी ओलांडून त्यांना पुढं जावं लागतं. पावसाळ्यात नदीला पाणी जास्त असल्यावर मुलांच्या जीवाला धोकाही असतो. जर नदी पार करायची नसेल तर मुलांना थेट 8 किलोमीटर लांबून पायपीट करावी लागते. हा रस्ता जंगलातून जात असल्यानं वन्य प्राण्यांची भीती आहे. शिक्षणासाठी मुलांची आदिवासी मुलांची ही धडपड कुणाला दिसली नसेल असं नाही. मात्र लोकप्रतिनिधी याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकच नाही तर पाड्यावरील कुणी आजारी पडला तर त्याला चादरीची झोळी करून, अशा परिस्थितीत रुग्णालयात नेलं जातं. त्यामुळे सरकारच्या विविध योजना नेमक्या कुणाला आणि त्या योग्य लाभार्थ्यांपर्यंत कोण पोहचवणार हा प्रश्न अनुत्तरीतचं राहत आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!