सोनू_तुझा_माझ्यावर_भरवसा नाय काय। Sonu_Tuza_Mazyavar_Bharosa_Nay_Kay। आणि सोनूचा भाऊ रागावला

147 views · Published 3 August 2017 · 1:00 · Indexed 8 November 2026

Channel: Om Said · 2017 · People & Blogs

Watch on YouTube

आणि सोनूचा भाऊ रागावला कारण ऐकून आणि व्हीडिओ पाहून तुम्हाला धक्काच बसेल.....
#सोनू_तुझा_माझ्यावर_भरोसा_नाय_काय
#Sonu_Tuza_Mazyavr_Bharosa_Nay_Kay

महाराष्ट्रासह जगाला वेड लावणाऱ्या ‘सोनू’चा निर्माता सोलापूरचा पठ्ठ्या
Abpmajha 3 Aug. 2017 15:41

पुणे : ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय…’ या गाण्याने सध्या धुमाकूळ घातला आहे. खरं तर हे गाणं खुप वर्षांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्वरुपात गायलं जातं आहे. मात्र सध्या जे गाणं लोकप्रिय झालंय, ते सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी गावातील अजय क्षीरसागर आणि त्यांची पत्नी भाग्यशाली क्षीरसागर यांनी बनवलंय.
सध्या प्रत्येकाच्या मोबाईलमधे, चौकाचौकात एवढंच काय महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय’ हा प्रश्न गाण्यातून विचारला जातो आहे.
या गाण्याच्या माध्यमातून विचारला जाणाऱ्या प्रश्नामुळे मुंबईतील खड्डयांचा प्रश्न यावर्षी पुन्हा चव्हाट्यावर आला आणि त्यावरुन मोठं राजकारणही झालं. मात्र, जानेवारी महिन्यात अजय क्षीरसागर यांनी हे गाणं बनवलं, तेव्हा या गाण्यावरुन एवढ महाभारत होईल याची कल्पनाही त्यांना नव्हती.
कुर्डूवाडीतील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या भावाला सोबत घेऊन फक्त व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवण्यासाठी त्यांनी हे गाणं तयार केलं आणि त्याला अफाट प्रतिसाद मिळाला.
व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर या गाण्याला मिळणारा प्रतिसाद पाहून अजय क्षीरसागर यांनी हे गाणं पत्नीसोबत रेकॉर्ड करायचं ठरवलं.
पुण्याजवळील आळंदीमध्ये त्यांनी हे गाणं रेकॉर्ड करुन ते यूट्यूबवर अपलोड केलं. त्यानंतर तर या गाण्याला आणखीच हिट्स मिळू लागल्या. कॉलेज, कट्टा, मोबाईल ग्रुपमध्ये हे गाणं वेगाने लोकप्रिय झालं.
या गाण्याची लोकप्रियता फक्त मराठी किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही. हिंदी आणि इतर भाषांमध्येही हे गाणं त्या त्या भाषेतील शब्दांसह तयार करण्यात आलं. एवढंच काय, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना न्यायालयाच्या आदेशानंतर पद सोडावं लागल्यानंतर पाकिस्तानी तरुणांनी नवाझ शरीफ यांची खिल्ली उडवण्यासाठीही याच गाण्याचा उपयोग केला.
खरं तर ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय’ हे गाणं अगदी तीस-चाळीस वर्षांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गायलं जातं आहे. महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनांमध्ये तर या गाण्याला हमखास टाळ्या मिळत आल्या आहेत. कुर्डूवाडीच्या अजय क्षीरसागर यांनी पुन्हा ते नव्यानी लोकप्रिय केलं
https://youtu.be/zvHmpLMYedA

More from this channel