ब्रेकफास्ट न्यूज | शबरीमाला मंदिराचं दार आज सर्वांसाठी खुलं होणार

1,023 views · Published 17 October 2018 · 1:37 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज संध्याकाळी मासिक पुजेसाठी हे मंदिर प्रथमच उघडले जाणार आहे. 
त्यामुळे या मंदिरात महिलांना प्रवेश मिळतो की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. काल अय्यप्पाच्या भाविकांनी शबरीमला मंदिराकडे निघालेल्या १० ते ५० वर्षे वयोगटातील मुली आणि महिलांना रोखल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या इथं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
महिलांना मंदिरात प्रवेश दिल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा काही भाविकांनी दिला आहे. महिनाभराची यात्रा राजघराण्याच्या पूजेने सुरू होते; परंतु महिलांच्या प्रवेशास विरोध करणारे मुख्य पुजारी  पूजेसाठी न येण्याची शक्यता आहे. महिलांचा प्रवेश रोखण्याचा भक्त संघटनांनी चंग बांधल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel