उस्मानाबाद | शाळकरी विद्यार्थ्यांची चक्क कोंबड्यांप्रमाणे वाहतूक

2,885 views · Published 17 October 2018 · 3:54 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या पंचेचाळीस स्कूलबसवर काल उस्मानाबादमध्ये कारवाई कऱण्यात आली. यात सात आसनी वाहनांमध्ये चक्क पन्नास चिमुकले विद्यार्थी बसले होते. यात एका स्कूल बसचालकाला पकडण्यात आले. 
पकडलेल्या पंचेचाळीस वाहनांपैकी बारा वाहनांकडे विद्यार्थी वाहतुकीचा कसलाच परवाना नव्हता, इतर ३३ वाहनांनी मंजूर विद्यार्थी क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक विद्यार्थी गाडीत बसवले होते. या गाड्या जप्त करून आरटीओ ऑफिसमध्ये लावण्यात आल्यात बावन हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आलाय.

More from this channel