712 : दिल्ली : खरिपात दीडपट हमीभाव मिळणार, केंद्राच्या तिजोरीवर पडणार अतिरिक्त भार

290 views · Published 3 July 2018 · 0:51 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाची हमी दिली खरी, मात्र त्याचा मोठा भार केंद्राच्या तिजोरीवर पडणार असल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे सरकारनं हमीभावाचं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं, तर सरकारवर १ लाख ७५ हजार कोटींपर्यंत अतिरिक्त भार पडणार आहे. ही तूट कशी भरुन निघेल आणि हमीभाव कसा देता येईल याबाबात अर्थखात्याचे अधिकाऱ्यांची खलबतं सुरु आहेत. या आठवड्याभऱात हमीभावाची घोषणा होईल, असं सांगितलं जात आहे. हमीभावाच्या तुलनेत जर पिकाची किंमत ही बाजारभावापेक्षा २० टक्क्यानं कमी असेल तर पडणारा भार हा साधारण १ लाख १३ हजार कोटींच्या घरात असेल, असा अंदाज ICRIER या अर्थविषयक संस्थेनं काढलेला आहे.

More from this channel