नाशिक : घोटीमध्ये तिहेरी हत्याकांड, हत्येचं कारण अस्पष्ट

1,990 views · Published 30 June 2018 · 0:42 · Indexed 16 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिक जिल्ह्यातल्या घोटी जवळच्या खेड भैरववाडी गावामध्ये तिहेरी हत्याकांडं घडलं आहे. सचिन चिमटे या संशयिताने आपल्या चुलत भावाचं संपूर्ण कुटुंब संपवलं. आज सकाळी 11च्या सुमारास ही घटना घडली. सचिनने आपला चुलत भाऊ गणेशच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांवर सपासप वार केले. यामध्ये गणेश यांच्या आईचा आणि पत्नी मंगलाचा जागीच मृत्यू झाला तर लहान मुलगा रोहित याचीही उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी करून तिथून चाकू ताब्यात घेतला आहे.

More from this channel