नागपूर | नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरासमोरील उड्डाणपुल लवकरच जमीनदोस्त होणार

1,406 views · Published 29 September 2018 · 2:47 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत उड्डाणपूल पाडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. २०0८ साली आघाडी सरकारच्या काळात हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता. १६ कोटी २३ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा पुल तोडण्यात येणार आहे. गर्दी आणि रहदारीला हा उड्डाणपूल कारणीभूत ठरत असल्यानं महापालिकेत ९२ विरुद्ध २५ असं मतदान घेऊन हा पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उड्डाणपूल पाडून इथं रस्ता रुंदिकरणाचं काम केलं जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

More from this channel