पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं दमदार पुनरागमन, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
1,764 views · Published 18 August 2018 · 1:16 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापुरातही पावसाचा जोर वाढलाय. साताऱ्यातील कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे.. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्या दुथडी भरुन वाहताना दिसतायत..प्रशासनानं कोयना नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे..कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे...यामुळं राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत..पंचगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्यानं नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आलाय..धरणातून पाणी सोडल्यामुळं पडळी पुलावर पाणी आलंय. दरम्यान कोयना धरणातून मागील दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दुसरीकडे चांदोली धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वाढवल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली असून ही नदी देखील पात्राबाहेर पडली आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!