तुळजाभवानी मंदिरातील 262 कर्मचारी संपावर | उस्मानाबाद | एबीपी माझा

1,716 views · Published 7 November 2018 · 0:43 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरातील 262 कर्मचारी संपावर गेलेत.. मंदिराची सुरक्षा आणि स्वच्छता करण्याचं काम मुंबईच्या क्रिस्टल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कंत्राटी कर्मचारी करतात.. त्यांना महिन्याला 6 हजार रुपयांचं मासिक वेतन दिलं जातं.. परंतु मागील दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं या कर्मचाऱ्यांनी दिवाळसणात संपाचं हत्यार उपसलंय... या कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी नसते, पीएफ किती कपात होतो, याची माहिती कंपनी देत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. त्यामुळे सुट्टीच्या आणि दिवाळी सणादरम्यानच कर्मचार्यांनी संप पुकारल्यानं तुळजाभवानी मंदिर परिसरात गोंधळ निर्माण झालाय...
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel