बदलापुरात बुंदीच्या लाडूत अळ्या आढळल्या!

1,006 views · Published 16 September 2018 · 1:22 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

एकीकडे वडापावमध्ये पाल सापडण्याचं सत्र सुरु असतानाच, बदलापुरात आता बुंदीच्या लाडूत अळ्या सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वांगणीला राहणारे किरण मेढेकर हे गुरुवारी संध्याकाळी बदलापूरच्या कात्रप भागात राहणारे त्यांचे मित्र शशांक सिनलकर यांच्याकडे येत होते. शशांक यांच्याकडे गणपती असल्यानं त्यांनी प्रसाद म्हणून मधुरम स्वीट्स नावाच्या दुकानातून अर्धा किलो बुंदीचे लाडू घेतले. मात्र घरी गेल्यावर हे लाडू उघडून खात असतानाच त्यात अळ्या असल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांनी दुकान गाठून दुकानदाराला जाब विचारला.
यावेळी लाडूतल्या काजूमधून या अळ्या लाडूत गेल्याची शक्यता असल्याचं सांगत दुकानदाराने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

More from this channel