अहमदनगर | सत्यजीत तांबे यांची राज्य युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड

2,031 views · Published 14 September 2018 · 0:32 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी बाजी मारली आहे. सर्वाधिक मते घेत सत्यजीत तांबे यांनी युवक काँग्रेस अध्यक्षपद पटकावलं. वाशिम जिल्ह्यातील रिसोडचे आमदार अमित झनक यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. त्यामुळे अमित झनक यांच्याकडे उपाध्यक्षपद असेल. शिवाय कुणार राऊत हे सुद्धा उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. सत्यजीत तांबे यांच्या विजयानंतर संगमनेरमध्ये तांबेच्या निवासस्थानी एकच जल्लोष झाला. कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे हात बळकट करणार असल्याची प्रतिक्रिया तांबे यांनी दिली. युवकांना बरोबर घेऊन राहुल गांधीना पंतप्रधान करण्यासाठी आपली निवड असल्याचं सत्यजीत तांबे म्हणाले.

More from this channel