नवी मुंबई : सिडकोकडून नवी मुंबईत 15 हजार घरांसाठी लॉटरी

2,441 views · Published 10 August 2018 · 0:41 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नवी मुंबईत स्वतःचं घर विकत घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सिडकोने खुशखबर आणली आहे. सिडकोच्या माध्यमातून सुरु असलेल्या 15 हजार घरांच्या विक्रीसाठी 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं आहेत. विशेष म्हणजे या घरांसाठी म्हाडाच्या धर्तीवर ऑनलाईन अर्ज मागवले जाणार आहेत. 15 ऑगस्टपासून या प्रक्रियेला सुरुवात करण्याची सिडकोची तयारी आहे. सर्वसामान्य ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सिडकोने विविध आर्थिक गटांसाठी पुढील वर्षभरात नवी मुंबई क्षेत्रात 55 हजार घरं बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी 14 हजार 820 घरांचं बांधकाम प्रगतिपथावर आहे. ही घरं कळंबोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली या पाच नोडमध्ये उभारली जात आहेत. यात एकूण 11 गृहप्रकल्पांचा समावेश आहे.

More from this channel