ब्रेकफास्ट न्यूज : ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं निधन

305 views · Published 23 August 2018 · 1:45 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं. दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये काल रात्री कुलदीप नय्यर यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली अनेक दशकं कुलदीप नय्यर हे पत्रकारितेत सक्रीय होते. तसेच त्यांनी अनेक पुस्तकं लिहून देशाच्या विचारविश्वातही बहुमूल्य योगदान दिलं.

स्वातंत्र्यपूर्व काळात 14 ऑगस्ट 1923 रोजी पंजाब प्रांतातील सियालकोट येथे कुलदीप नय्यर यांचा जन्म झाला. आता सियालकोट पाकिस्तानचा भाग आहे.

लाहोरमधील फोरमन खिश्चन कॉलेजमधून बीए (ऑनर्स) पदवी मिळवून, पुढे लाहोरमधीलच लॉ कॉलेजमधून एलएलबी पदवी संपादित केली. नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीतून नय्यर यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं.

More from this channel