मुंबई : समुद्रकिनाऱ्यांवर विषारी 'ब्लू बॉटल' जेलीफिश
3,118 views · Published 30 July 2018 · 2:02 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
जुहू आणि गिरगाव समुद्रकिनाऱ्यांवर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येत विषारी ’ब्लू बॉटल’ जेलीफिश आढळत आहेत. सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांच्या निदर्शनास हे जेलीफिश आले. हे जेलीफिश दंश करत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून, उत्साहाच्या भरात समुद्रात उतरु नये, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे. समुद्राच्या लाटांसोबत हे जेलीफिश हेलकावे घेतात. छत्रीच्या आकाराचे असणारे हे जेलीफिश दिसायला आकर्षक असतात, मात्र यातल्या काही प्रजाती विषारी आहेत. मुंबईच्या समुद्रात साधारणत: तीन प्रकारचे जेलीफिश आढळतात. पावसाळ्याआधी ‘ब्लू बटन’ नावाचे जेलीफिश समुद्रकिनारी येतात, तर पावसाळ्यात ‘ब्ल बॉटल’ आणि पावसाळ्यानंतर ‘बॉक्स’ जेलीफिश किनाऱ्यावर येतात. यातील ब्लू बॉटल जेलीफिश विषारी असतात.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट