इंग्लंड | कॅट | डोंबिवलीच्या मयुर कार्लेकरांवर तरुणांचा हल्ला

1,447 views · Published 19 September 2018 · 1:16 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

डोंबिवलीतून इंग्लंडमध्ये स्थलांतरित झालेले मयुर कार्लेकर इंग्लंडमधील राहत्या घरातून बाहेर पडण्याच्या विचारात  आहेत... कारण शनिवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास 4 किशोरवयीन मुलांनी त्यांच्या इंग्लंडमधील घरावर हल्ला केलाय... कार्लेकर इंग्लंडच्या केंटमधील ऑरपिंग्टन भागात राहतात... त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रितू आणि दोन मुलंही वास्तव्याला आहेत.. शनिवारी मध्यरात्री 12 ते दीडच्या  सुमारास ४-५ किशोरवयीन मुलांनी घराला आग लावली.. शिवाय गाड्या पेटवल्याचं त्यांनी म्हटलंय...पोलिसांत तक्रार करण्यासाठी त्यांना 32 तास थांबावं लागलं, तसंच 7 वेळा फोनही करावा लागला. त्यामुळे आपण इंग्लंडमध्ये असुरक्षित असून पुन्हा एकदा हल्ला झाल्यास आपण इंग्लंडमधून बाहेर पडू, असंही कार्लेकर यांनी सांगितलंय.

More from this channel