मुंबई | बकरी ईदचा देशभरात उत्साह, नमाज पठणासाठी मुस्लीम बांधवांची दर्ग्यात गर्दी

1,283 views · Published 22 August 2018 · 0:53 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

निष्ठा, त्याग आणि बलिदानाचा संदेश देणारी ईद-ऊल-अदहा अर्थात बकर ईद उत्साही वातावरणात देशभर साजरी होतेय..बकरी ईदनिमित्त सकाळी सर्व मशिदीत मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण केली. यावेळी पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.  इस्लामिक मान्यतेनुसार हजरत इब्राहिम आपला मुलगा हजरत इस्माईल याला याच दिवशी अल्लाहच्या आदेशानुसार 'कुर्बान' करण्यासाठी घेऊन निघाले होते. तेव्हा बलिदानावेळी बोकड प्रकट करुन अल्लाहने त्यांच्या मुलाला जीवनदान दिले. या दिवसाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. बकरी ईद निमित्त आज बकरे, मेंढ्यांची मोठ्या प्रमाणात ‘कुर्बानी’ देण्यात येते.

More from this channel