मुंबई : 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'चे दिग्दर्शक विजय गुट्टे यांना अटक

3,035 views · Published 3 August 2018 · 1:59 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अनुपम खेर यांच्या आगामी 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या सिनेमाचे दिग्दर्शक विजय गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे. 34 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी जीएसटीच्या इंटेलिजन्स विंगने त्यांना बेड्या ठोकल्या. विजय गुट्टे यांना जीएसटी कायद्याच्या कलम 132 (1) (क) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. विजय गुट्टे तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचं सांगितलं जात आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्याची रवानगी 14 ऑगस्टपर्यंत आर्थर रोज जेलमध्ये करण्यात आली आहे. विजय गुट्टे हे रत्नाकर गुट्टेंचे पुत्र आहेत. रत्नाकर गुट्टे यांच्यावरही 5500 कोटींच्या बँक घोटाळ्याचा आरोप आहे. परभणीतील गंगाखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. रत्नाकर गुट्टेंवर घोटाळ्याचा आरोप करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी त्यांना महाराष्ट्राचा 'छोटा मोदी' असल्याचं म्हटलं होतं.

More from this channel