सातारा : आरटीओ कार्यालयातील सरकारी कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

2,248 views · Published 7 August 2018 · 1:24 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सातव्या वेतन आयोगाचा लाभ १ जानेवारीपासून नव्हे तर तात्काळ लागू करा, या प्रमुख मागणीसह राज्यातले सरकारी कर्मचारी आजपासून पुढचे ३ दिवस संपावर गेले आहेत. या संपात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश असेल. त्यामुळे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या शाळाही ३ दिवस बंद राहणार आहेत.
या संपात सरकारी रुग्णालयाचे काही कर्मचाऱीही सहभागी झाल्यानं रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास झाला..शिवाय मंत्रालय, महापालिका, नगरपालिका बंद असल्यानं शुकशुकाट होता... संपामुळे सर्वसामान्यांची कामं रखडली... 
दरम्यान, या संपातून दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांनी माघार घेतली आहे. तरीही या संपात १७ लाख सरकारी कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा करण्यात येतोय. तर संपात सहभागी होणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा राज्य शासनानं दिला आहे.. संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई केली जाईल असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे..

More from this channel