देहराडून : उत्तराखंडमध्ये देवीधुरात रक्षाबंधनादिवशी दगड आणि फळं फेकण्याची प्रथा

2,031 views · Published 26 August 2018 · 1:32 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

उत्तराखंडातील देवीधुरामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी एक अनोखी प्रथा पार पडली. देवीधुरातील बाराही देवीच्या मंदिर परिसरात पाषाण आणि फळांचा पाऊस पाहायला मिळाला. बग्वाल असे या प्रथेला म्हटलं जातं. यावेळी दोन गट एकमेकांवर दगड आणि फळं फेकतात. बग्वाल खेळणाऱ्या व्यक्तीचं चारित्र्य पवित्र असेल तर त्याला या दगडांद्वारे कोणतीही इजा होणार नाही. अशी या मंडळीची मान्यता आहे. श्रावणमधल्या एकादशी ते श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्यंत देवीधुरा यात्रा सुरु असते. आणि रक्षाबंधनाच्या दिवशी ही आगळी-वेगळी प्रथा दरवर्षी पार पडते. मुसळधार पावसात बग्वालचा उत्साह आणखी शिगेला पोहोचला होता. या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी देश-परदेशातील अनेक लोकं उपस्थित होते.

More from this channel