नांदेड : एकाच कुटुंबातील तिघांवर हुंडा मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल

1,123 views · Published 22 June 2018 · 0:34 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

एका कुटुंबातील तिघांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा नांदेडमध्ये दाखल करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे त्या तीन व्यक्तींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या तीनही व्यक्ती पेशाने न्यायाधीश आहेत. या तिघांनी आपला साडे अकरा लाख रुपयांच्या हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार एका महिलेनं केली आहे. तसंच अंगावरील ८ लाख रुपयांचे दागिने काढून घेतले आणि दोन दिरांनी विनयभंग केल्याचंही या महिलेने तक्रारीत म्हटल आहे. पीडितेचा पती न्यायाधीश शेख वसीम अक्रम, दीर न्यायाधीश शेख अमीर आणि पीडितेचा नंदावा न्यायाधीश शेख जावेदसह एकूण ७ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

More from this channel