नागपूर | नागपुरातून चार बांगलादेशी घुसखोर अटकेत

1,310 views · Published 27 August 2018 · 0:41 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नागपूरमध्ये चार बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केलीय. यातील एकाचा बांगलादेशातील अन्सारुल बांगलादेशी टीम या विघातक संघटनेशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. हे चारही जण भारतात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याच्या नावाखाली घुसल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे स्वतःला भारतीय सिद्ध करण्यासाठी त्यांनी आधार कार्ड. पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्र मिळवल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चारही बांगलादेशींनी स्वःला भारतीय सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड आणि पासपोर्ट असे दस्तावेज बनविले होते... धर्म प्रसारकाच्या नावाखाली भारतात शिरून इथल्या गर्दीत मिसळून जाण्यामागे त्यांचे नेमके काय उद्दिष्ट होते याचा पोलीस शोध घेतायेत.

More from this channel