नागपूर | स्वतःच्याच मुलाला सेक्रेटरी करुन महापौर नंदा जिचकार अमेरिका दौऱ्यावर
1,960 views · Published 16 September 2018 · 2:01 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी महापौरांच्या एका जागतिक परिषदेला स्वतःच्या मुलाला नेल्याने वाद रंगला आहे. नंदा जिचकार यांनी मुलगा प्रियांशला महापौरांचा म्हणजेच स्वतःचाच पर्सनल सेक्रेटरी म्हणून नेल्याची माहिती आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरात ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर्स फॉर क्लायमेट ॲण्ड एनर्जी ( Global Covenant of Mayors for Climate & Energy) अशी परिषद पार पडली. या परिषदेत 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान हवामान आणि ऊर्जेच्या बदलासंदर्भात जगभरातील महापौर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. या परिषदेत नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी दक्षिण आशियाचे प्रतिनिधित्व करत नागपूरमध्ये वातावरण बदलासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांसंदर्भात सादरीकरण केलं. मात्र परिषदेसाठी जाताना त्यांनी पर्सनल सेक्रेटरी म्हणून आपला मुलगा प्रियांशची निवड केल्यामुळे वाद निर्माण झाला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!