नवी मुंबई : खंडणी न दिल्याने भाजप नगरसेवकाची हॉटेल मालकाला मारहाण

4,717 views · Published 13 August 2018 · 1:38 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

खंडणी न दिल्याने भाजप नगरसेवकाने हॉटेलमालकाला बेदम मारहाण केल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. खारघर इथल्या सेक्टर 4 इथे नवीन हॉटेल चालवणाऱ्या व्यावसायिकाला 50 हजार रुपयांची खंडणी न दिल्याने भाजप नगरसेवकाने बेदम मारहाण केली आहे. 

आपल्या गुंडांना घेऊन हॉटेलमध्ये येत धुमाकूळ घालणाऱ्या नगरसेवक शत्रुघ्न काकडे याचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मारहाणीत जखमी झालेले हॉटेल मालक इस्माईल शेख यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

More from this channel