पाकिस्तान | इम्रान खान शपथविधी | परराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांच्याशी खास बातचित
406 views · Published 18 August 2018 · 12:25 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान म्हणून माजी क्रिकेटर आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान आज शपथ घेणार आहेत. भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता हा शपथविधी सोहळा सुरू होईल. इस्लामाबादमध्ये हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी भारताचे माजी कसोटीवर आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिद्धू उपस्थित राहाणार आहेत. अटारी-वाघा बॉर्डरवरून सिद्धू पाकिस्तानात दाखल झाले आहेत. सिद्धू यांच्या व्यतरिक्त माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनादेखील शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण होतं. पण वैयक्तिक कारणास्तव त्यांनी आमंत्रण नाकारलं. इम्रान खान यांच्या पक्षाला २७२ पैकी फक्त ११६ जागांवर विजय मिळाला होता. पण अन्य छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी जेमतेम बहुमत मिळवलं. पंतप्रधान निवडीसाठी पाकिस्तानातील नॅशनल अॅसेंबलीमध्ये शुक्रवारी मतदान झालं. यात इम्रान खान यांनी १७६ मतं मिळवून पंतप्रधानपदी आपलं नाव कोरलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!