लखनौ : पासपोर्ट हवा असेल तर आधी धर्म बदला, अधिकाऱ्याचा दाम्पत्याला अजब सल्ला
544 views · Published 21 June 2018 · 1:24 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पासपोर्ट हवा असेल तर तुमचा धर्म बदला, असं धक्कादायक सल्ला पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्याने एका व्यक्तीला दिला. उत्तर प्रदेशातील लखनौच्या पासपोर्ट कार्यालयात एका हिंदू-मुस्लीम दाम्पत्यासोबत हा प्रकार घडला. परदेशात जाण्यासाठी तन्वी सेठ आणि अनस सिद्दीकी या दाम्पत्याने पासपोर्टसाठी अर्ज केला आहे. पासपोर्ट कार्यालयाकडून त्यांना मुलाखतीसाठीही बोलावलं. मुलाखतीदरम्यान लखनौ पासपोर्ट कार्यलयाचा अधीक्षक विकास मिश्र, तन्वी सेठ यांना म्हणाला की, तुमच्या प्रकरणात अडचणी आहेत. तुम्ही मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केलं आहे तर तुमचं नाव तन्वी सेठ कसं काय असू शकतं? नाव बदलणं हे तुमचं कर्तव्य आहे. तर अनसचा पासपोर्ट रिन्यू करायचा होता. पासपोर्ट अधीक्षक विकास मिश्रने अनसला धर्म बदलण्यासाठी सांगितलं. हिंदू धर्म स्वीकारुन पत्नीसोबत सात फेरे घ्या, असं कर्मचाऱ्याने अनसला सांगितलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!