नवी दिल्ली | राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी महामंत्री रामलाल अमित शाहांच्या भेटीला

633 views · Published 16 October 2018 · 0:47 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भाजपाचे राष्ट्रीय संघटन महामंत्री रामलाल यांनी थोड्या वेळापूर्वी अमित शाहांची भेट घेतलीय. कालच राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी रामलाल यांच्यासोबत चर्चा केली... खरंतर दानवे आणि मुख्यमंत्री अमित शाहांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते, पण अमित शाह मध्य प्रदेशमधील प्रचारात व्यस्त असल्यानं त्यांची भेट होऊ शकली नाही... त्यामुळे रामलाल यांनी दोघांशी चर्चा केली... आणि आता कालच्या बैठकीचा वृत्तांत देण्यासाठी रामलाल अमित शाहांच्या भेटीला गेलेत... त्यानंतर अमित शाह यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय... त्यामुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व एकूणच सेनेचा सहभाग आणि मंत्रिमंडळ विस्तारावर काय भूमिका मांडतं, हे पाहावं लागेल.

More from this channel