ब्रेकफास्ट न्यूज | पुणे | शेतकरी सुरेेश पोकळे यांचंं अनोखं सेलिब्रेशन

2,776 views · Published 6 September 2018 · 0:50 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुणे तिथे काय उणे, या म्हणीची प्रचिती पुण्यात पाहायला मिळतेय,.. गोल्डनमॅनसाठी तर गोल्डन शर्टसाठी प्रसिद्ध असलेलं पुणे आता गोल्डन पेढ्यांसाठी प्रसिद्ध झालंय..धायरीतल्या सुरेश पोकळे या शेतकऱ्यानं आलिशान अशी जॅग्वार एक्सएफ गाडी घेतली.. आणि त्याचा आनंद त्यांनी चक्क सोन्याचा वर्ख असलेले पेढे वाटून साजरा केलाय.. सुरेश पोकळे यांनी महागडी गाडी खरेदी केल्यानंतर त्याचा आनंदही त्यांना शाही पद्धतीनं सेलिब्रेट करायचा होता.. त्यामुळे त्यांना लोकांना सोन्याचे पेढे देऊन तोंड गोड करायचं होतं.. त्यांनी याविषयी काका हलवाई मिठाईवाल्यांकडे बोलणी केली असता त्यांनी पोकळे यांच्यासाठी विशेष सोन्याचे वर्ख असलेले पेढे बनवून दिले... 7 हजार रुपये किलो दरानं काका हलवाईनं पोकळे कुटुंबियांना हे खास पेढे बनवून दिलेत.

More from this channel