पत्नीसाठी सिमेंटचा ताजमहाल बांधणाऱ्या अवलियाचा अपघाती अंत | लखनौ | एबीपी माझा
4,911 views · Published 10 November 2018 · 0:55 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
आपल्या पत्नीसाठी सिमेंटचा ताजमहाल बांधणाऱ्या उत्तर प्रदेशातल्या आधुनिक शहाजहाँचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. 87 वर्षीय फैजुल हसन कादरी यांचा बाईकच्या धडकेत करुण अंत झाला. ज्याप्रमाणे शहाजहाँने मुमताजसाठी आग्य्रात संगमरवरी दगडाचा ताजमहाल उभारला. त्याचप्रमाणे फैजुल यांनी दिवंगत पत्नी बेगम तज्जमुली यांच्या स्मरणार्थ सिमेंटचा ताजमहाल बांधला. फैजुल यांच्या अमर प्रेमाची देशभर चर्चाही झाली. पोस्टमास्टर पदावरुन निवृत्त झालेल्या फैजुल यांच्या पत्नीचं 2011 मध्ये निधन झालं होतं. त्याच वर्षी त्यांनी कसेरा कला या आपल्या गावात ताज महाल बांधण्यास सुरुवात केली. अनेक जणांनी त्यांना आर्थिक मदतही देऊ केली, मात्र त्यांनी ती स्वाभिमानाने नाकारली. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश सिंग यांनीही त्यांची भेट घेतली होती. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!