नागपूर : शिफ्टनंतर परवाने जारी, नागपुरात लर्निंग लायसन्स घोटाळा

890 views · Published 6 August 2018 · 4:06 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नागपूरच्या आरटीओ कार्यालयामध्ये वेळ संपल्यानंतर लर्निंग लायसन्स देण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे व्हीआयपी श्रेणीतल्या शिकाऊ वाहन चालक परवान्यांचा घोटाळा असल्याचा आरोप होत आहे. सरकारी कामकाजाची वेळ संपल्यानंतर म्हणजेच संध्याकाळी सहा वाजल्यानंतर अनेक तरुणांना लर्निंग लायसन्स देण्यात आले. ऑनलाईन लायसन्सची प्रक्रिया ही संगणकाद्वारे केली जाते. यासाठी 14 संगणक आहेत. मात्र जे लायसन्स देण्यात आले आहेत, त्यांचे आयपी अॅड्रेस तपासले असता ते 51 संगणकांद्वारे करण्यात आल्याचं समोर आलं. राज्यातील आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसेन्सच्या ऑनलाईन प्रक्रियेत घोटाळा करणारे काही भ्रष्ट अधिकारी चोऱ्या घडवून आणि आग लावून कार्यालयीन पुरावे नष्ट करत असल्याचा आरोप होत आहे.

More from this channel