सांगली | तासगाव | मते दिली नाहीत म्हणून मातंग समाजातील तरुणाची हत्या

2,902 views · Published 6 September 2018 · 0:56 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सांगलीतील राजेश फाळके हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी राजेश पाटील याला कराडमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केलीय. ग्रामपंचायत निवडणुकीत मातंग समाजाची मते पडली नाहीत, याचा राग मनात धरून मातंग समाजाच्या एका तरुणाची हत्या केल्याची घटना सांगलीतल्या तासगाव तालुक्यात घडली आहे. राजेश फाळके असं मृत तरुणाचं नाव असून धक्कादायक गोष्ट ही की ही हत्या युवक राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाने केल्याचा आरोप आहे.

More from this channel